Pune | Tue, 21 April 2026

No Ad Available

नवी मुंबई महापालिकेतील आर्थिक अनियमिततेवर उपाध्यक्ष बनसोडे यांचे कठोर कारवाईचे निर्देश

Admin | 3 views
नवी मुंबई महापालिकेतील आर्थिक अनियमिततेवर उपाध्यक्ष बनसोडे यांचे कठोर कारवाईचे निर्देश

मुंबई, दि. २१: नवी मुंबई महानगरपालिकेतील आर्थिक अनियमिततेप्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

विधान भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील विविध कामांमध्ये अनावश्यक खर्च झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या कामांशी संबंधित ठेकेदारांची नावे अहवालात समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले असून, दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करून ब्लॅकलिस्टमध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

००००

राजू धोत्रे/विसंअ


Join WhatsApp