Pune | Tue, 03 March 2026

No Ad Available

राजधानीत संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Admin | 9 views
राजधानीत संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, 1: संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार,  उपअभियंता किरण चौधरी तसेच महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी संत रविदास महाराज यांच्या सामाजिक समतेच्या संदेशाचा, त्यांनी भक्तीमार्गातून केलेल्या समाजप्रबोधनाचा आणि मानवतेच्या कल्याणासाठी दिलेल्या योगदानाचा सर्वांना परिचय करून दिला.


Join WhatsApp